वृक्षतोडीच्या दंडाला विरोध कण्यासाठी दोडामार्गात आज शेतकरी मेळावा

Edited by:
Published on: August 19, 2024 10:02 AM
views 219  views

दोडामार्ग : शासनाने जाहीर केलेल्या वृक्षतोडबंदीसाठी 50 हजार रुपये दंड हा शेतकऱ्यांना अन्यायकारक असून याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज मंगळवारी साटेली भेडशी येथे आयंकाळी ४ वाजता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य मंत्रिमंडळात नुकताच अवैध्य वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी विविध सोळा प्रजातीच्या वृक्ष तोडीवर पन्नास हजार रुपये दंड आकारण्याचा अन्याय कारक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे जिल्यातील शेतकरी मेटाकुटीस येणार आहे. आधीच येथिल भौगोलिक परिस्थिती पाहता येथिल शेतकऱ्यांच्या नावावर तुटपुंजी जमीन आहे. त्यातही एका सातबारावर अनेक नावे असतात त्यामुळे वृक्षतोड करताना वनविभागाची परवानगी घेताना अनेक अडचणी येतात.

कोकणातील ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्थ कारण हे वनशेती वर मोठया प्रमाणात अवलंबून असते शेतकरी प्रामुख्याने साग, फणस, आंबा आदी झाडे मोठ्याप्रमाण लागवड करून वाढवतात व पूर्ण वाढ झालेली झाडे गरजेनुसार विकून आपली उपजीविका भागवतात. मात्र शासनाने ही झाडे प्रामुख्याने ५० हजार दंड करणाऱ्या झाडांच्या यादीत टाकल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत सापडणार आहे. त्यामुळे शासनाच्या या अन्यायकारक निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांनी संघटित होऊन आवाज उठवतण्याचे नियोजन केलंय. यासाठी साटेली येथिल सार्वजनिक गणेशउत्सव च्या सभामंडप येथे मंगळवारी सायंकाळी 4.00 वाजता शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. या वेळी भाजपा युवा मोर्चा चे विशाल परब या सह मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मेळाव्याला तालुक्यातील शेतकऱ्यानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.