भास्कर जाधवांच्यासमोरच संदेश पारकरांना कॉंग्रेस मध्ये येण्याची खुली ऑफर

पहा कोणी दिली ऑफर ?
Edited by: उमेश बुचडे
Published on: July 14, 2023 12:41 PM
views 1012  views

कणकवली : युवानेते संदेश पारकर यांच्या वाढदिवस कार्यक्रमानिमित्त शिवसेना(उ.बा.ठा) नेते, आमदार भास्कर जाधव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत. कणकवली भगवती मंगल कार्यालय मध्ये सुरू असलेल्या वाढदिवसावेळी खासदार विनायक राऊत, शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद  शेख यांनी बोलताना सांगितले की संदेश पारकर यांनी राजकीय जीवनामध्ये न्याय मिळत नाही काम करायचे आणि संघर्ष करायची सवय त्यांची  आहे. कुठेतरी त्यांना न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी या वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये  शेख यांनी केली. जर योग्य न्याय मिळत नसेल तर  पारकर यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शेख यांनी दिली.