संदीप गावडे मित्रमंडळाकडून ओपन गरबा नाईट

Edited by: विनायक गांवस
Published on: October 06, 2024 10:21 AM
views 163  views

सावंतवाडी : संदीप गावडे मित्रमंडळ आणि रोट्रॅक्ट कल्ब सावंतवाडी यांच्यावतीने आज पासून तीन दिवस ओपन गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ :३० वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणारं आहे. आज ६ ऑक्टोबर रोजी ओपन गरबा नाईट, ७ ऑक्टोबर रोजी ओंकार डान्स अकॅडमीचा नृत्य, हास्य आणि विनोदाचा धमाका असलेला कार्यक्रम असणार आहे.यावेळी खास आकर्षणं  साईलिला, तिरुपती बालाजी दर्शन, अयोध्यापती रामलल्ला देखावा, तामिळनाडू येथील दहाफुटी सुब्रमण्यम देव आदी देखावा असणार आहेत. तर ८ ऑक्टोबर रोजी पुन्हा ओपन गरबा नाईट असणार आहे. या सोबत लकी ड्रॉ. विविध गिफ्ट सुध्दा ठेवण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी सहभगी व्हावे असे आवाहन रोट्रॅक्ट कल्ब आणि संदीप गावडे मित्रमंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.