
दोडामार्ग : दहावी बारावी मध्ये आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपणाला ज्या क्षेत्राचि आवड आहे त्या क्षेत्रात जास्त लक्ष देऊन आपले नाव राज्यात देशात मानाने घेण्यासाठी एक वेगळे स्थान निर्माण करावे असे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थांना माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी केले आहे. दोडामार्ग शिवसेना व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आज तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा बाजारपेठेतील महालक्ष्मी सभागृहात संपन्न झाला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख नंदू शिरोडकर, शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, महिला जिल्हाप्रमुख ऍड निता सावंत, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, महिला तालुकाध्यक्ष चेतना गडेकर, शहरप्रमुख योगेश महाले, युवातालुख भगवान गवस, रामदास मेस्त्री, नंदू टोपले, सरपंच अनिल शेटकर, संजय गवस, गुरूदास सावंत, झोळंबे सरपंच विशाखा नाईक, कुडासे सरपंच पूजा देसाई, कोलझर सरपंच सुजल गवस, सविता नाईक, सानवी गवस, पूजा देसाई, लक्ष्मी करमळकर, लाडू अयनोडकर, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोकळे पुढे म्हणाले की, तुमच्या यशाची गुरुकिल्ली तुमच्या पाठीमागच्या विद्यार्थांना प्रदान करावी. तुम्ही कशाप्रकारे अभ्यास करून यशाची पायरी गाठली त्याबाबतही त्यांना मार्गदर्शन करावे. शिवाय आपले हे यश पुढील आयुष्यातही टिकून ठेवण्यासाठी कायम प्रयत्नरथ राहावे. व तालुक्याचे नाव उज्वल करावे असेही ते म्हणाले.
प्रचंड मेहनत घेऊन उच्च पद गाठावे : गणेशप्रसाद गवस
दीपक केसरकर यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही तालुक्यातील विद्यार्थांचा सत्कार कार्यक्रम ठेवला आहे. मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे गरजे आहे. जेणेकरून इतर मुलांनाही त्यातून प्रेरणा मिळेल हे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आपल्या भागातील विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन एखाद्या क्षेत्रातील उच्च पद गाठावे व आपल्या तालुक्याचे व पालकांचे नाव उज्वल करावे. शिक्षण घेताना एखाद्या विद्यार्थ्यांला काहीही अडचण उद्भवल्यास आमच्याशी संपर्क साधा आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी सांगितले. यावेळी प्रेमानंद देसाई, ऍड. नीता सावंत, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनीही मनोगते व्यक्त केली.