झोळंबेत "एक तास राष्ट्रवादीसाठी"...!

Edited by: विनायाक गावस
Published on: July 02, 2023 11:32 AM
views 99  views

सावंतवाडी : झोळंबे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार "एक तास राष्ट्रवादीसाठी" हा उपक्रम घेण्यात आला. सु-संवादातून परिवर्तनाकडे या धर्तीवर कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या परस्पर संवादातून आपल्या परिसराच्या विकासाबाबत संवाद या कार्यक्रमात केला जातो अशी माहिती कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी दिली.

यावेळी महिला निरीक्षक दर्शना बाबर देसाई, सुधीर गवस, मधुसूदन गवस, अजिंक्य गवस, सतीश गवस, प्रसाद गवस, दीपक गवस, अमोल गवस, लक्ष्मण गवस, नारायण गवस, आनंद गवस, देविका गवस, धनश्री गवस, साक्षी परब, पद्मावती गवस आदी पदाधिकारी उपस्थित होते.