न्हावेलीत "एक तास राष्ट्रवादीसाठी"...!

Edited by: विनायाक गावस
Published on: July 01, 2023 17:53 PM
views 204  views

सावंतवाडी : न्हावेली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार "एक तास राष्ट्रवादीसाठी" हा उपक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे, पक्षाची विचारधारा ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे व कार्यकर्त्यांच्या संवादातून परिसराच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे, असे उपक्रम एक तास राष्ट्रवादीसाठी या कार्यक्रमात राबविले जातात अशी माहिती कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी सावंतवाडी विधानसभा  मतदारसंघ उपाध्यक्ष अजित नातू, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला निरीक्षक दर्शना बाबर - देसाई, दीपक करमळकर, भरत धाऊसकर, राजेश धाऊसकर, सागर धाऊसकर, सुनिल धाऊसकर, सदानंद न्हावेलकर, प्रथमेश निरगुडकर, मितेश नाईक, देवानंद धाऊसकर, रामचंद्र धाऊसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.