हळबे महाविद्यालयात एकदिवसीय गणेश उत्सव साजरा..!

Edited by: संदीप देसाई
Published on: September 25, 2023 17:47 PM
views 77  views

दोडामार्ग : लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने एक दिवशीय गणेश उत्सव साजरा करण्यात आला. समाजात एकोपा व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली. महाराष्ट्रातील गणेश उत्सव हा अतिशय लोकप्रिय सण असून विशेष करून कोकणात घराघरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते हीच संकल्पना घेऊन महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने एक दिवशीय गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष सावंत यांच्या हस्ते विधि व पूजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आरत्या, भजने, फुगड्या असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख प्रा. रोहन बागकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक रोहन बागकर व हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.