केसरकर कुटुंबियांची दीड दिवसांची नागपंचमी

Edited by: भरत केसरकर
Published on: August 21, 2023 17:08 PM
views 301  views

कुडाळ : तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये "केसरकर" यांचा नागोबा हा दीड दिवसाचा असतो. जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील माणगाव खोऱ्यातील बहुतांश केसरकर जेवढी कुटूंब आहेत त्या सर्व कुटुंबियांचा हा नागोबा हा दीड दिवसांचा असतो.

    सर्वसाधारणपणे नागपंचमी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक दिवसा साठी साजरी केली जाते.. मात्र माणगाव खोऱ्यातील केसरकर या कुटुंबियांमध्ये पाच ते सात पिढ्यापासून हा सण दीड दिवस साजरा करतात.नागोबाचे सकाळीच पूजन गेल्यानंतर दुपारी प्रसाद दाखवला जातो. आज तळकोकणात आज नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. घरोघरी पर्यावरण पुरक अशा शाडूमातीने बनवलेल्या नागाच्या मुर्तीचे आजच्या दिवशी पुजन केले जाते. भाताच्या लाह्या आणि गुळाचा नैवेद्य ठेवून पारंपारिक पद्धतीने घरोघरी नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

दीड दिवस नागोबा का राहतो? याच आगळवेगळ कारण आहे. यानंतर हा नागोबा वस्तीला राहतो. फार वर्षांपूर्वी शेतकरी असलेल्या केसरकर कुटुंबा मध्ये सर्वजण शेतीच्या कामासाठी शेतावर गेले.मात्र शेतिचे कामे आटपून रात्री घरी आल्यावर बघतात तर नागोबाचे विसर्जन करायचे राहून गेले होते.अनावधानाने नागोबा विसर्जन करायचे राहून गेले. रात्री जेव्हा उशिरा लक्षात आलं तेव्हा नागोबा रात्री विसर्जन केला जात नाही. या संकल्पनेतून तो वस्तीला थांबतो. यानंतर सकाळीच एका छोट्या मुलाने तो नग्न अवस्थेत विसर्जन केले. या प्रथेनुसार नागोबा वस्तीला राहतो आणि दुसऱ्या दिवशी छोट्या मुलाकडून नग्न अवस्थेत विसर्जन केल जात. ही परंपरा  पाच ते सात पिढ्या माणगाव खोऱ्यातील केसरकर कुटुंबिय जपताहेत.