पुन्हा एकदा सावंतवाडी तहसीलदारांची कार्यतत्परता

मुसळधार पाऊस, धुक्याची तमा न बाळगता दुर्गम भागात जाऊन केला पंचनामा
Edited by: भगवान शेलटे
Published on: July 29, 2023 15:35 PM
views 430  views

सावंतवाडी : सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची कार्यतत्परता पुन्हा एकदा दिसून आली. कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून अनेक दुर्घटना घडत आहेत. अशीच गुरे वाहून जाण्याची दुर्घटना चौकुळ मधील चिखलव्हाळ बेरडकी मध्ये घडली..हे समजताच अशा दुर्गम भागात रात्रीच्या वेळी तहसीलदार पाटील यांच्यासह अन्य सहकारी पोहचून त्या घटनेचा पंचनामा केला...तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या या कार्यतत्परतेच आणि लोकांसाठी धावून जाण्याच्या कृतीच सर्व स्थरातून कौतुक होत आहे...


ही घटना कळल्यावर तहसीलदार पाटील यांनी कार्यालयीन काम आटपून तात्काळ घटनास्थळी जाण्यास निघाले. चौकुळ मधील चिखलव्हाळ बेरडकी ही वाडी अतिशय दुर्गम भागात आहे. चौकुळ पासून सुमारे १५ किमी तर सावंतवाडी पासून सुमारे ६० किमी अंतर आहे. येथे मुख्य व्यवसाय हा दुग्ध पालन हा आहे. सध्या अतिवृष्टी सुरू आहे त्यामुळे जनावरे वाहून जाण्याचा धोका वाढलेला आहे. या वाडीत काल तीन जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली अशी बातमी मिळाल्याने तहसीलदार श्रीधर पाटील संध्याकाळी उशिरा चौकुळ गावातील चिखलव्हाल बेरडकी येथे तलाठी, मंडळ अधिकारी , पशू वैद्यकीय पर्यवेक्षक यांच्यासहित भेट देवून तात्काळ पंचनामा केला. काही ठिकाणी अतिवृष्टीने घराची भिंत कोसळली होती तिथे भेट देवून पंचनामा करण्यात आला.

तहसीलदार यांनी भर पावसात, रात्रीच्या वेळी गावाला तात्काळ भेट देवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे मान्य केल्याने  शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांच्या या कृतीच कौतुकही होत आहे. भगवान शेलटे कोकणसाद live