मोती तलावाच्या काठावर रंगला पाडवा पहाट

Edited by: विनायक गावस
Published on: November 15, 2023 16:10 PM
views 114  views

सावंतवाडी : दिपावली पाडव्या निमित्त मोती तलावाच्या काठावर पहाटे पाडवा पहाट हा कार्यक्रम संपन्न झाला. पहाटेच्या सुमारास सुरांच्या मैफिलीत आल्हाददायक असा अनुभव संगीत रसिकांनी यावेळी घेतला. मोठ्या संख्येने संगीतप्रेमींची याप्रसंगी उपस्थिती होती.


पाडवा पहाटचे उद्घाटन सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आल. गेली सतरा वर्ष अध्यक्ष श्रीपाद चोडणकर यांच्या पुढाकाराने व सावंतवाडी नगरपरिषदेच्या सौजन्याने हा कार्यक्रम होत आहे. यंदा कार्यक्रमाचे अठरावं वर्ष होत. यावर्षीची पाडवा पहाट गायक प्रसन्न प्रभूतेंडोलकर, वर्षा देवण धामापुरक यांच्या स्वरमयी गाण्यानं रंगली. शास्त्रीय उपशास्त्रीय अभंग गायन यावेळी करण्यात आल. या मैफिलीत रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. यावेळी  संगीतसाथ हार्मोनियम निलेश मेस्त्री, तबला साथ किशोर सावंत, निरज मिलिंद भोसले तर ऑर्गनसाथ मंगेश मेस्त्री यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ पुराणीक यांनी केल. यासाठी ध्वनी व्यवस्था परेश मुद्राळे यांनी केली होती‌. याप्रसंगी दादा मडकईकर, गुरुप्रसाद चिटणीस, वैजनाथ देवण, नितिन धामापुरकर, मानसी भोसले, समृद्धी सावंत, केतकी सावंत, मधुरा खानोलकर, पुरूषोत्तम केळुसकर, सर्वेश राऊळ आदी उपस्थित होते