
वेंगुर्ला : माजी मुख्यमंत्री व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात आज २७ जुलै रोजी येथील एसटी बस डेपो च्या साई मंदिरात उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी लघुरुद्र करण्यात आले. यानंतर याठिकाणी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.

तसेच एसटी बस डेपोच्या आवारात यावेळी शिवसेना महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, तालुका संपर्कप्रमुख भालचंद्र चिपकर, शहरप्रमुख अजित राऊळ, एसटी डेपोचे बस स्थानक प्रमुख निलेश वारंग, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, माजी नगरसेविका सुमन निकम, महिला शहर संघटिका मंजुषा आरोलकर, विभागप्रमुख संदीप पेडणेकर, वायंगणी माजी सरपंच सुमन कामत, सुहास मेस्त्री, गजानन गोलतकर, हेमंत मलबारी, सुरेश वराडकर, संदीप केळजी, किरण सावंत, सचिन मांजरेकर, अपेक्षा बागायतकर, सुशीला नांदोस्कर, वैभव फटजी आदी उपस्थित होते.










