त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सावंतवाडीत होतोय दीपोत्सव !

महिलांनो सहभागी व्हा : बबन साळगावकर
Edited by: विनायक गावस
Published on: November 21, 2023 14:48 PM
views 144  views

सावंतवाडी : रविवार 26 नोव्हेंबर रोजी त्रिपुरा पौर्णिमा आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये दीपोत्सव होणार आहे.

या दीपोत्सवात शहरातील महिला भगिनींना पाच पणत्या जवळच्या मंदिरामध्ये लावून दीपोत्सवात मध्ये सहभागी व्हा, गेल्या वर्षी मोठ्या दिमाखात दीपोत्सवामध्ये महिना भगिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दर्शवला होता. तसेच विविध संघटना तसे मंदिराच्या व्यवस्थापक प्रमुखांनी भाग घेऊन शहरातील सर्व मंदिर एक एक दीप लावून उजळून निघाले होते. यंदाही पुन्हा  दीपोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल आहे.