नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त रेडीत उद्यापासून दशावतार नाट्य महोत्सव

प्रितेश राऊळ मित्रमंडळाचे आयोजन
Edited by: दिपेश परब
Published on: April 07, 2023 16:26 PM
views 108  views

वेंगुर्ला:

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढिवसानिमित्त रेडी येथे प्रितेश राऊळ मित्रमंडळाच्या वतीने पुरस्कृत आणि दशावतार कला प्रेमी ग्रुप रेडी यांच्यावतीने शनिवार दि. ८ एप्रिल ते शुक्रवार दि. १४ एप्रिल या कालावधीत भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

   या दशावतारी नाट्य महोत्सवाचे उद्घाटन ८ रोजी  सायंकाळी ६ वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. व यानंतर चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळाचा शिवशक्ती वेताळ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. ९ एप्रिल रोजी मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे, कुडाळ यांचा कृष्ण पूजन नाट्यप्रयोग, ११ एप्रिल रोजी अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचा पंढरीचा पहिला वारकरी नाट्यप्रयोग, १२ एप्रिल रोजी गुरूकृपा दशावतार नाट्य मंडळ , हळवल यांचा द्रौपदी वस्त्रहरण नाट्यप्रयोग, १३ एप्रिल रोजी हेळेकर दशावतार नाट्य मंडळ , कारिवडे यांचा एक डाव नगीनीचा नाट्यप्रयोग, १४ एप्रिल रोजी सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ, झरेबांबर,दोडामार्ग यांचा शापमुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. हे सर्व नाट्यप्रयोग रेडी ग्रामपंचायत पटांगण येथे ८ ते १४ एप्रिल रोजी रोज सायंकाळी ७ वाजता सुरू होणार असून सर्व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रितेश राऊळ मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.