अमृत महोत्सवाच्यानिमित्ताने ग्रामपंचायत तिवरे इथं 75 वृक्षारोपण

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 14, 2023 20:36 PM
views 189  views

कणकवली :75 व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायत तिवरे येथे 75 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या अमृत महोत्सव निमित्ताने कै.राजाराम मराठे कृषि महाविद्यालयातील कृषीदुतांनी मोलाचे योगदान दिले. वृक्षारोपणासाठी तिवरे ग्रामपंचायत सरपंच रवींद्र आंबेलकर, राजेंद्र सावंत व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी ही उपस्थित होते. 


प्रज्योत माने,विशाल शिंदे,स्वप्निल ढोले, हर्षवर्धन पवार, ओंकार चव्हाण, महेश साळुंखे, साई पवन ,शिव किशोर रेड्डी इत्यादी कृशिदुतही उपस्थित होते. तसेच या कृषी दुतांनी विविध प्रकारचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना करून दाखवले. या विद्यार्थ्यांना प्राचार्य पंकज संते, प्राध्यापक पियुष शिर्के, प्राध्यापक योगेश जंगले, इत्यादींचे मार्गदर्शन लाभले.