
सावंतवाडी : तहसिलदार कार्यालय इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट झालेले आहे. या इमारतीचा छप्परातून पाण्याचा विसर्ग होत असून ही इमारत कोसळण्याची दाट शक्यता आहे.
इमारतीत तालुक्यातील गावातील अनेक लोक आपल्या कामांसाठी येत असतात. त्यामुळे ही इमारत कोसळल्यास मोठ्या प्रमाणात जीवीत व वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इमारतीवर छप्पर बांधून पाण्याचा विसर्ग होण्यापासून त्वरीत उपाययोजना करावी. अन्यथा १५ ऑगस्ट २०२३ रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणे भाग पडेल याची नोंद घ्यावी, उपोषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अगर माझे जीवीताचे काही बरेवाईट झालेस त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असा इशारा रफीक इब्राहीम शेख यांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंतांना दिला आहे.