पहिल्या श्रावण सोमवारी नितेश राणे कुणकेश्वर चरणी नतमस्तक

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 05, 2024 05:54 AM
views 283  views

देवगड : श्रावणी सोमवार ला आज पासून सुरूवात झाली असून सोमवार या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात हा दुग्धशर्करा युक्त योग असून हा योग जवळपास 72 वर्षांनी जुळून आला आहे. आणि या अद्भुत शुभ योगसाधत पहिल्या श्रावणी सोमवार च्या पूजेचा मान आ. नितेश राणे व सौ नीलमताई राणे यांना कुणकेश्वर  देवस्थान ट्रस्ट ने दिला असून... कुणकेश्वरची पूजा करताना सौ.निलमताई राणे व आमदार नितेश राणे सर्व जनता सुखी होवो! असे श्री देव कुणकेश्वरला आ. नितेश राणे यांनी साकडे घातले देव कुणकेश्वराचे दर्शन घेऊन "तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी" या उपक्रमाची सुरुवात करणार असा संकल्प त्यांनी यावेळी केला आहे. आ. नितेश राणे देव कुणकेश्वराची पूजा करून आपल्या जनसंपर्क मोहिमेला आज पासून सुरुवात  करणार आहेत.

कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार  नितेश राणे हे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या पवित्र दिवशी देव कुणकेश्वराची पूजा केली व आपल्या जनसंपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे. आपल्या आमदारकीच्या दहा वर्षांच्या कालावधीतील विकास कामांचा लेखा जोखा या निमित्ताने जनतेसमोर मांडला जाणार असून, जनतेच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत. या काळात तीन तालुक्यातील २६३ गावांना भेटी देण्याचे उ‌द्दिष्ट ठेवण्यात आले असून कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यां समवेत मतदारसंघातील जनतेशी संवाद साधून आशिर्वाद घेतले जाणार आहेत.