मंत्री केसरकरांच्या वाढदिनी शिलेदारांनी जपली सामाजिक बांधिलकी

वाढदिवस उत्साहात
Edited by: विनायक गावस
Published on: July 18, 2023 12:28 PM
views 166  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापुर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा ६८ वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पदाधिकारी व दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं.


वाढदिवसाच्या औचित्य साधून चिमुकल्याच्या हस्ते केक कापून मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी जेष्ठ नगरसेविका अनाराजीन लोबो, तालुकाप्रमुख बबन राणे, महिला शहराध्यक्ष भारती मोरे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई, सुरेंद्र बांदेकर, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, सुजित कोरगावकर, गजानन नाटेकर, श्री. घाग, अब्जू सावंत, शुभांगी सुकी, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, दत्ता सावंत, परशुराम चालवाडी नीलिमा चालवाडी, प्रतिक बांदेकर, विशाल बांदेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते