ऐन गणेश चतुर्थीत वायंगणतड इथं वृद्धेचं घर कोसळले

Edited by: लवू परब
Published on: September 03, 2024 14:59 PM
views 202  views

दोडामार्ग : सध्या दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने दोडामार्ग तालुक्यात ठिकठिकाणी पडझड होऊन नुकसान झाले आहे. या पडणार्‍या मुसळधार पावसाने वायंगणतड येथील ताराबाई महादेव नाईक यांच्या मातीच्या घराची भिंत कोसळुन मोठे नुकसान झाले. ही वृध्दा आपल्या घरात एकटीच राहते. त्यामुळे तिच्यावर मोठे संकट निर्माण झाले. अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव येवुन ठेपला असुन अचानक भिंत कोसळल्याने ही वृध्दा मोठ्या संकटात सापडली त्यामुळे या वध्देला मदतीच्या हाताची गरज आहे.

ऐन गणेश चतुर्थी आणि घरावर संकट काय करू देवा कोण मदत करणार अशी हाक ती वयोरुद्ध  महिला सध्या देत आहे. पावसामुळे घराची भिंत पडली आणि काय करू आता गणपती बाबा तूच काय तरी आता हाकेला धाव अस ताराबाई म्हणत आहे.