युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने गुणवंतांचा स्मार्ट वॉच - भेटवस्तू देत गौरव

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 21, 2023 18:06 PM
views 91  views

कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ - सांगवे आणि जिजाऊ शैक्षणीक सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्यावतीने आज बुधवार दिनांक २१ जुन २०२३ रोजी माध्यमिक विद्यालय कनेडी, सांगवे येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत यांच्या हस्ते १० वी व १२ वी परीक्षेतील १५ गुणवंत विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच व इतर स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्याना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे १०/१२ परीक्षेत १००% निकाल आल्या बद्दल कनेडी मध्यामिक विद्यालयातील मुख्याध्यापक सुमन दळवी व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जिजाऊ शैक्षणीक सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हात २ लाख वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी मार्गदर्शन करताना संदेश सावंत यांनी विद्यार्थ्याना कोणतीही अडचण आली तर आपल्याकडे यावे मोठा भाऊ म्हणून मी नेहमीच मदतीसाठी तयार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांनी उपक्रमाचे कौतुक करून युवा संदेश प्रतिष्ठान मार्फत वर्षभर चालणाऱ्या शैक्षणीक उपक्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पीडी सावंत ,संजय सावंत गुरुजी, विभागीय अध्यक्ष विजय भोपटे, व्ही बी सावंत, गणपत सावंत, आर एच सावंत,सुमंत दळवी, सुरेश ढवळ ,प्रशांत बोभाटे, गणपत सावंत नरडवे सरपंच,मंगेश बोभाटे गांधीनगर सरपंच अशोक कांबळे,संजय सावंत, तुषार गावडे ,एन बी सावंत , प्रभाकर सावंत, वैभव नार्वेकर , राजेश साबळे, राजेंद्र गावकर ,रायमन गोंन्सालविस, राजेश पवार ,मिलिंद बोभाटे ,राजश्री पवार ,स्मिता मालडीकर ,पवार मॅडम, बावतीस गोंन्सालविस व परिसरातील शिक्षणप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते