रक्तपिशवी दरवाढी विरोधात ३ एप्रिल रोजी उ. बा. ठा. युवासेना छेडणार तीव्र आंदोलन

सिंधुदुर्गनगरी येथे रक्तदान करत सरकारचा करणार निषेध : सुशांत नाईक यांची माहीती
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 28, 2023 08:02 AM
views 141  views

कणकवली : शिंदे भाजप सरकारकडून  राष्ट्रीय रक्त धोरणाची अंमलबजवणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील  शासकीय व अशासकीय रक्त पेढ्यांमार्फत केल्या जाणाऱ्या रक्त पुरवठा सेवा शुल्काचे नवीन दर लागू केले आहेत. या दारामध्ये मोठी तफावत असून ठाकरे सरकारच्या काळात शासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त  पिशविचा दर ४५० होता तोच दर आता ११०० रु.करण्यात आला आहे.तर अशासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त  पिशविचा दर १५५० रु करण्यात आला आहे. हे दर सर्व सामान्यांना परडणारे नसल्याने या दरवाढी विरोधात युवासेनेच्या वतीने ३ एप्रिल २०२३ रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. असा निर्णय आज युवासेनेच्या बैठकीत घेण्यात आला. 

          युवासेना कणकवली विधानसभा मतदारसंघाची बैठक आज कणकवली विजय भवन येथे संपन्न झाली. या बैठकीत रक्त दरवाढीवर चर्चा करण्यात आली. केंद्रातील भाजप  सरकार जीवनावश्यक सर्वच गोष्टींचे दर वाढवीत असून  गॅस, पेट्रोल, डीझेल,कडधान्य, लाईट बिल याचे दर भरमसाठ वाढवण्यात आले आहेत.केंद्रातील भाजप  सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत आता  राज्यातील शिंदे भाजप सरकारने देखील लोकांचा जीव वाचवणाऱ्या रक्त पिशव्यांच्या पूर्वीच्या ४५० रु  दरात  वाढ करून आता रक्त पिशवी ११०० रु ला देण्यात येणार आहे.मात्र या दरवाढी विरोधात युवासेना आक्रमक पवित्रा घेणार आहे. तसे नियोजन बैठकीत करण्यात आले. 

             यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, देवगड तालुकाप्रमुख फारिक काझी, गणेश गावकर, वैभववाडी तालुकाप्रमुख रोहित रावराणे, कणकवली उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर,ललित घाडीगावकर, रीमेश चव्हाण, आदित्य सापळे, नितेश भोगले,  धीरज मेस्त्री, सचिन खोचरे, रोहित राणे, उद्धव पारकर, इमाम नावलेकर, सिद्धेश राणे, चेतन सावंत,श्री. पाटील आदि उपस्थित होते.