
देवगड : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील ( स्तर-३ ) टप्पा -३ च्या ५ प्रतिनिधींचे पाणी पुरवठा योजनेशी निगडीत जल साक्षरता विषयक दोन दिवशीय अनिवाशी प्रशिक्षण देवगड येथे जि.प सिंधुदूर्ग व जे. पी.एस. फाऊंडेशन लखनौ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या प्रशिक्षणामध्ये क्षमता बांधणी व समुदाय विकास तज्ञ रूपाजी किनळेकर मार्गदर्शन करताना म्हणाले की ग्रामीण भागात पाण्याची उपलब्धता , शाश्वतता व स्वच्छतेची स्थिती सुधारणेसाठी व टिकविण्यासाठी विविध उपक्रम राबवुन ग्रामस्थांणमध्ये जाणीव जागृती केली जात आहे . ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची वाटचाल शाश्वततेकडे होण्यासाठी जल साक्षरता होणे गरजेचे आहे त्यासाठी पाणी पुरवठा योजनेची संबधित प्रतिनिधींसाठीचे हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे .
या प्रशिक्षणामध्ये जल साक्षरता अभियान , त्यांचे महत्त्व आणि नपापु योजनेची नियमित संचालन , देखभाल व दुरूस्ती , जल जीवन मिशन योजना , पाणी पुरवठा योजनेमधील भविष्यातील आव्हाने , आणि त्यावरील उपाययोजना , जल जीवन मिशन योजना आणि मालकी , माझ्या गावचे पेयजल अंदाजपत्रक , माझ्या गावचे पेयजल अंदाजपत्रक , पेयजल संहिता , पाणी पट्टीचे महत्त्व , ग्राम आरोग्य , पोषण , पाणी पुरवठा , व स्वच्छता समितीच्या भुमिका व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन मास्टर ट्रेनर गणेश जेठे , मास्टर ट्रेनर विजय रेडकर , मास्टर ट्रेनर जयराम जाधव , क्षमता बांधणी व प्रशिक्षण इंदिरा परब ,गटसमन्वयक अविनाश सावंत , समुह समन्वयक समिल नाईक, गटसमन्वयक वैशाली मेस्त्री यांनी केले. या प्रशिक्षणाचे प्रस्तावणा इंदीरा परब सुत्रसंचालन रुपाजी किनळेकर तर आभार वैशाली मेस्त्री यांनी मानले .