ओंकार कला नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचं थाटात आगमन..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 13, 2023 18:34 PM
views 156  views

सावंतवाडी : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवासाठी शहरातील ओंकार कला नवरात्रोत्सव मंडळा, भटवाडीच्या दुर्गा मातेचे मिरवणुकीने सायंकाळी थाटात आगमन झाले.

माजगाव येथील मांजरेकर यांच्या चित्र शाळेतून दुर्गा मातेच्या मूर्तीचे वाजत गाजत आगमन भटवाडी येथे सायंकाळी झाले. यावेळी दिलीप भालेकर, कुणाल शृंगारे, भार्गव धारणकर आदीसह मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.