ओंकारची पावलं सावंतवाडीच्या दिशेन ?

Edited by: विनायक गांवस
Published on: November 14, 2025 22:34 PM
views 348  views

सावंतवाडी : ओंकार हत्ती माजगाव गावात दाखल झाला आहे. चिपटेवाडी येथे त्यानं दर्शन दिलं. कर्नाटक, गोवा राज्यातून सध्या तो महाराष्ट्रात स्थिरावला आहे‌. सध्या त्याची पावलं सावंतवाडीच्या दिशेने वळवत आहे. 

बांदा, वाफोली, भालावल, डेगवे, तांबोळी, ओटवणे, इन्सुली फिरून ओंकार हत्ती आता वेत्ये मार्गे माजगावात दाखल झालाय. एकंदरीत परिस्थिती बघता ओंकरला क्वारंटाईनसाठी वनताराला पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. ओंकारसह जनता, गुरांच्या सुरक्षिततेचा विचार केला गेला आहे. मात्र, ओंकारची स्वारी आता थेट सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली आहे. वेत्येमार्गे तो कुडाळ तालुक्यात जाण्याची देखील शक्यता आहे.