
सावंतवाडी : ओंकार हत्ती मुंबई गोवा महामार्गावर आला असून दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली आहे. गेले अनेक दिवस मडुरा भागात असलेला हा हत्ती आता इन्सुलीच्या हद्दीत आला आहे. त्याला पकडण्यासाठी वनविभागाची टीम तैनात असून बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. लवकरात लवकर ओंकारला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.










