उद्धव बाळासाहेेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी जाहीर | आ. वैभव नाईक - हरी खोबरेकर यांनी केलं अभिनंदन

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 18, 2023 13:42 PM
views 333  views

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी शिशुपाल राणे व पेंडूर पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी उमेश प्रभु तसेच दांडी शाखाप्रमुख पदी हेमंत मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. आपल्या पदाला न्याय देऊन संघटना वाढीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती  मंदार केणी, उपतालुकप्रमुख बाळ महाभोज, शहर प्रमुख  बाबी जोगी, उपशहरप्रमुख सन्मेष परब, महीला उपजिल्हा संघटक सेजल परब,कृष्णा पाटकर, सचिन मालवणकर, स्वप्नील आचरेकर, नरेश हुले, सिद्धू मांजरेकर, महेंद्र म्हाडगुत, मनोज मोंडकर, बाबु वाघ,उमेश चव्हाण, युवतीसेना शहरप्रमुख सुर्वी लोणे,अनिल वाक्कर आदी उपस्थित होते.