कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पीएमजीएस आणि सीएमजीएसच्या सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मात्र शासनाचे रस्ते मंजूर होऊन सुद्धा या रस्त्याची वर्क आर्डर करायला अधिकारी बघत नाहीत. आपल्या कुडाळ मालवण मतदारसंघातील तब्बल 35 रस्ते ची कामे मंजूर असून या कामांची टेंडर प्रोसेस करण्यासाठी अधिकारी टक्केवारी शिवाय टेंडर प्रोसेस करत नाहीत. असा गंभीर आणि धक्कादायक आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.जर या आठ दिवसात काम सुरू झाली नाहीत तर या 35 गावातील लोकांना घेऊन या दोन्ही कार्यालयांना टाळ्या ठोकण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या कामाच्या भूमिपूजनाच्या रस्त्याचे अधिकारी टेंडर प्रोसेस करायला बघत नाहीत. त्यामुळे अधिकारी कसे वागत आहेत.याचा हा प्रत्यय येतोय. असं सांगत महायुती सरकारला आमदार वैभव नाईक यांनी आरोप करत अधिकारी वर्गाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे...