
वेंगुर्ला : शहरातील प्रसिद्ध आंबा बागायतदार प्रितम सावंत यांनी त्यांच्या घरी विराजमान श्री गणेशाला आंब्याचा हंगाम नसताना हापूस आंब्यांचा नैवेद्य अर्पण केला. आंब्याच्या हंगामात एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे साठवण करून ठेवलेले हे हापूस आंबे पावसाळी हंगामात श्री गणेशाला अर्पण करण्यात आले. सावंत कुटुंबीय हे आंबा बागायतदार असून त्यांना ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. यावर्षी घरी येणाऱ्या गणरायाला सुद्धा हापूस आंब्याचा नैवेद्य द्यावा अशी सर्वांची इच्छा असल्याने हा नैवेद्य आंबा हंगाम नसताना सुद्धा श्री गणरायाला अर्पण करण्यात आला.