श्री देव कुणकेश्वर चरणी चांदीचा टोप अर्पण

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 23, 2025 18:44 PM
views 243  views

देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर चरणी चांदीचा टोप अर्पण करण्यात आला आहे. म्हस्के मंगल सराफ तिसगांव, ता- पाथर्डी, जि- अहिल्यानगर यांनी कुणकेश्वर चरणी सुमारे ३.५० लाख रुपये किंमतीचा चांदीचा टोप अर्पण केला. 

येथे स्वयंभु महास्थळ श्री देव कुणकेश्वर चरणी लाखो भाविक येवून नतमस्तक होवून दर्शन घेतात आणि आपआपली मनोकामना व्यक्त करतात. नवसाला पावणारा – हाकेला धावणारा श्री कुणकेश्वर स्वयंभु महादेव भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. मे. म्हस्के मंगल सराफ यांसारखे असे अनेक शिवभक्त येथे येऊन वर्षानुवर्षे श्री देव कुणकेश्वर ची मनोभावे सेवा करतात.

या सर्वांचे श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट-कुणकेश्वर वतीने यथोचित सन्मान व आभार मानण्यात आले आहेत. यापूर्वी देखील अनेक शिवभक्तांनी चांदीचे अभिषेक पात्र,चांदीचे आसन, चांदीची प्रभावळ, चांदीची दैनंदिन पुजा दरम्यान लागणारी चांदीची भांडी सामान श्री देव कुणकेश्वर चरणी अर्पण केलेले आहे.