शिवउद्योगच्या स्टॉल्सना ओबीसी व्हिजेएनटी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 18, 2025 15:04 PM
views 28  views

कुडाळ : शिवसेना शिवउद्योग संघटनेच्या वतीने कुडाळ सिंधुदुर्ग मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या बचतगटांच्या स्टॉल्सना आज ओबीसी व्हिजेएनटी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन बचतगट चालवणाऱ्या महिलांच्या कार्याचे कौतुक केले.

शिवउद्योग जिल्हाप्रमुख विश्वास गावकर आणि उपजिल्हाप्रमुख रचना नेरुरकर यांच्या संकल्पनेतून हे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तू आणि उत्पादनांचे प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आले आहे.

यावेळी स्टॉल्सला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात ओबीसी व्हिजेएनटी शिवसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीधर पेडणेकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, तालुकाप्रमुख रुपेश पिंगुळकर, संघटक कानू शेळके, महिला तालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी आणि तालुकाप्रमुख राकेश नेवाळकर यांचा समावेश होता.

याचबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय पडते, स्वरूप वाळके, जयदीप तुळसकर, अरविंद करलकर, भोगटे आणि अनिकेत तेंडोलकर हे देखील उपस्थित होते.

यावेळी सर्व स्टॉलधारकांकडून त्यांच्या उत्पादनांची माहिती घेण्यात आली. महिलांनी बनवलेल्या वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

ओबीसी व्हिजेएनटी शिवसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीधर पेडणेकर यांनी यावेळी बोलताना सर्व स्टॉलधारक महिलांचे विशेष कौतुक केले. तसेच, त्यांच्या उत्पादित वस्तूंना मोठी आणि कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शिवसेना आणि संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या या आश्वासनामुळे बचतगट महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला सक्षमीकरण आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरली.