पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी सावंतवाडी नगरपरिषदेकडून शपथ

Edited by: विनायक गावस
Published on: September 08, 2023 16:52 PM
views 122  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेकडून आवाहन करत शपथ देण्यात आली. कळसूळकर हायस्कूल मध्ये गोमय गणपती, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा का करायचा ? यांसह माझी वसुंधरा अभियानाची माहिती उद्यान पर्यवेक्षक गजानन परब यांनी दिली‌. तर हरित शपथ  घेतली गेली. मुख्यधिकारी सागर  साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी उद्यान पर्यवेक्षक गजानन परब, संगणक अभियंता प्रथमेश कसालकर,आरोग्य विभाग प्रमुख रसिका नाडकर्णी  व इतर कर्मचारी उपस्थित होते.