
कणकवली : इंडियन न्यूक्लिअर सोसायटी तसेच इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्स व न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गात एस एस पी एम अभियांत्रिकी कॉलेज, कणकवली या ठिकाणी 6 ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी 10 ते सा. 5:30 या वेळेत अणुऊर्जा वापर जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत भाभा अणुसंशोधन केंद्र चे शास्त्रज्ञ डॉ. विवेक पारकर , व्ही व्ही वझे , डॉ. मोहित त्यागी, डिपार्टमेंट ऑफ ऍटोमिक एनर्जीचे डॉ. एस मल्होत्रा, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे उदय कशाळीकर आणि इंडियन न्यूक्लिअर सोसायटी चे अध्यक्ष डॉ. बी. एन. जगताप हे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. पाहूया अणुच्या अंतरंगात, अणु तंत्रज्ञान आणि प्रगती, नाभिकीय ऊर्जा आवश्यकता क्रांती एवं वास्तविकरण, अणुऊर्जा स्वच्छतेसाठी अपरिहार्य पर्याय आणि हरित वीज निर्मिती, तसेच डिपार्टमेंट ऑफ ऍटोमिक एनर्जी मध्ये उपलब्ध असलेल्या संधी याविषयी सकाळच्या सत्रात मार्गदर्शन देण्यात येईल.
दुपारच्या सत्रात NPCIL तर्फे अणुभट्टींच्या विविध मॉडेलचे प्रात्यक्षिक व प्रदर्शन दाखविण्यात आले तसेच विद्यार्थाना माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड याची स्थापना 1987 मध्ये भारत सरकारने डिपार्टमेंट ऑफ ऍटोमिक क एनर्जी यांच्या अंतर्गत केली आहे. त्यांच्या माध्यमातून 7580 मेगाव्याटच्या 23 अणुभट्ट्यांचे बांधकाम झाले आहे व 7500 मेगावॅटच्या अणुभट्ट्यांचे काम सध्या चालू आहे.
इंडियन न्यूक्लिअर सोसायटी ही नोंदणीकृत संस्था असून अणुविज्ञान व तंत्रज्ञान तसेच विज्ञान, अभियांत्रिकी, या क्षेत्रात विज्ञानाच्या प्रगतीला चालना देण्याच्या दृष्टीने कार्यरत आहे. इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्स ही संस्था विज्ञानातील वेगवेगळ्या क्षेत्रात जनजागृती करण्याचे काम करत आहे. या करिता प्रोग्रॅम कोऑर्डिनटोर म्हणून प्रा.दर्शन म्हापसेकर यांनी काम पाहिले.
या कार्यशाळेकरिता संस्थेच्या अध्यक्षा निलमताई राणे, उपाध्यक्ष निलेश राणे, सचिव नितेश राणे, प्राचार्य डॉ. महेश साटम , प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे तसेच सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.