
कणकवली : कणकवलीत विद्युत शव दाहिनी मिळावी, यासाठी पहिली मागणी कणकवली नगरपंचायतने केली होती. कारण कोरोना कालावधीत मृतदेहाचे दहन करणे, यासाठी जास्त लाकडांची गरज लागत होती. पण लाकडांच्या तुटवड्यामुळे नगरपंचायतीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यासाठी माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्युत शव दाहिनी दिल्या होत्या.
कणकवली नगरपंचायत स्मशानभूमीतील या विद्युत शवदाहीनीवर गुरुवारी पहिल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अस्थी विसर्जन करण्यासाठी मिळतात. ह्या विद्युतदाहिनीतून बाहेर येणार धूर पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.