आता नॉन क्रिमी लेअरमुळे प्रवेश रखडणार नाही...!

Edited by:
Published on: June 24, 2023 15:27 PM
views 141  views

सावंतवाडी : २०२३-२४ च्या इयत्ता ११ वी च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र सादर करु न शकल्यास, विद्यार्थ्याकडून अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र भरुन घेऊन प्रवेश देण्यात यावा. तसेच विद्यार्थ्यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३ महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांना दिले आहेत. याबाबतची माहिती सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे