आता कणकवलीकरांना खेळता येणार टेबल टेनिस,माईणकर अकादमी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन.

म्हाळसाबाई भांडारकर हिंद छात्रालय ,टेंबवाडी कणकवली येथे चंद्रकांत माईंणकर टेबल टेनिस अकॅडमीची स्थापना.
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 10, 2023 09:56 AM
views 405  views

कणकवली :कणकवली म्हटलं की खेळाडू घडवणारी नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे .कारण कबड्डीचे,क्रिकेट व इतर खेळातुन खेळाडू कणकवलीतून घडले आहेत. सिंधुदुर्गातील खेळाडु आंतरराष्ट्रीय  पातळीवर नेतृत्व करत आहेत. चंद्रकांत माईणकर अकादमीचे संस्थापक चंद्रकांत माईणकर ह्यानी सुध्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर  भारताचे नेतृत्व केले आहे .सिंधुदुर्गातुन टेबल टेनिस खेळाडू देखील घडावेत आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जावर खेळून आपले नाव उज्वल करावे यासाठी चंद्रकांत माईनकर टेबल टेनिस अकॅडमी च्या वतीने प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन कणकवलीचे नामांकित डाॅ.बी जी शेळके यांच्या हस्ते  म्हाळसाईबाई भांडारकर हिंद  छात्रालय ,टेंबवाडी या ठिकाणी करण्यात आले.  यावेळी प्रमुख उपस्थिती नितीन तळेकर ,adv.सुदीप कांबळे ,संजय कदम, अमोल कांबळे,डी. डी. कदम उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत माईणकर यांनी बोलताना सांगितले की सिंधुदुर्गाशी माझे वेगळेच नाते आहे. त्यामुळे येथे आल्यानंतर मला सिंधुदुर्गासाठी काहीतरी करावेसे वाटते. यासाठीच मी माझा आंतरराष्ट्रीय पातळीवर टेबल टेनिस खेळण्याचा अनुभव,खेळाचे ज्ञान येथील मुलांना देवुन येथील मुले आंतरराष्ट्रीय  पातळीवर टेबल टेनिस खेळतील असे खेळाडु घडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे .त्यामुळेच मी या अकॅडमीची स्थापना केली आहेआणि आपल्या जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील यासाठी माझा नेहमी प्रयत्न राहणार असल्याचे माईणकर यांनी सांगितले.