आता भाकरी परतण्याची वेळ : सगुण धुरी

Edited by: भरत केसरकर
Published on: October 27, 2023 19:41 PM
views 207  views

कुडाळ : आता भाकरी परतण्याची वेळ आली आहे.त्यामुळे सर्वोदय पतसंस्थेचे सभासद करपलेली भाकरी परततील. यामुळे काहीही झाले तरी परिवर्तन अटळ असून विद्यमान चेअरमन प्रकाश मोर्ये यांचा पराभव निश्चित आहे. या निवडणुकीत प्रकाश मोर्ये यांचा पराभव करून त्यांना गोठोसची वाट दाखवणार असा थेट इशारा सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव सहकार वैभव पॅनलचे प्रमुख सगुण धुरी यांनी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला दिला आहे.तसेच आपल्या पॅनलचा विजय होईल असा दावा केला आहे.बाराच्या बारा जागेवर आपले पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा सगुण धुरी यांनी केला आहे.