
वैभववाडी: शहरातील स्टॉलबाबतच्या विषयांत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी स्टाॅलधारकांना चुकीची वागणुक दिली.उपोषणावेळी उद्धटपणे उत्तरे दिली असा आरोप स्टाॅल संघटनेचे नेते जयेंद्र रावराणे यांनी केला आहे.तसेच त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी आम्ही करणार आहोत, असे रावराणे यांनी सांगितले.
शहरातील स्टाॅल हटाव मोहीमेविरोधात स्टाॅलधारकांनी उपोषण केले होते.हे उपोषण शुक्रवारी सायंकाळी स्थगित केले.संघटनेचे नेते जयेंद्र रावराणे यांनी कोकणसाद लाईव्हशी बोलताना ही माहिती दिली.ते म्हणाले,कालच उपोषण आम्ही आ.नितेश राणे यांच्या आश्वासनामुळे स्थगित केले आहे.स्टाॅलधारकंवर अन्याय होणार नाही असा शब्द आ.राणे यांनी दिला.त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले.मात्र या उपोषणावेळी मुख्याधिकारी यांनी स्टाॅलधारकांना चुकीची वागणुक दिली.या आंदोलनात महीला सहभागी होत्या.या कालावधीत नगरपंचायतीचे शौचालय जाणीवपूर्वक बंद ठेवले.महीलांना यामुळे नाहक त्रास सहन करावा.तसेच उपोषण स्थळी आल्यावर देखील उद्धटपणे उत्तरे दिली.याबाबत आम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत.तसेच त्यांची वैभववाडीतून बदली करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचे श्री.रावराणे यांनी सांगितले.