
सिंधुदुर्ग : ०७ जून ते ११ जून कालावधीत 35 ते 45 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असून त्याचा वेग 55 पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे, तरी यांत्रिक व यंत्रचलित नौकांनी पावसाळी मासेमारी बंदी कालावधीचे पालन करावे. तसेच बिगर यांत्रिकी नौकांनी देखील या कालावधीत खाडी क्षेत्रात अथवा समुद्रात मासेमारीस जाऊ नये. वादळी वारे सह पाऊसाचे हवामान योग्य होईपर्यंत जिल्हातील कोणत्याही नौका वादळी हवामानाच्या या कालावधीत समुद्रात जाणार नाहीत याबाबत खबरदारी घेण्यात यावी, नौका, जाळी, इंजिन आदी मासेमारी साधने सुरक्षित ठिकाणी ठेवावी. योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असं आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांनी केलं आहे.