
दोडामार्ग : तीन महिन्यांपूर्वी साटेली भेडशी ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेला निर्णय उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी ग्रामपंचायत साटेली भेडशी यांना लेखी पत्राद्वारे हा ग्रामसभेने घेतलेला निर्णय ग्रामपंचायतीने घेतलेला ठराव हा या अधिकाराचा सरळ उल्लंघन आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला व्यक्तीच्या व्यवसायावर बंदी घालण्याचा अधिकार नाही. असे कळवून संविधानाचा अवमान करणारा आहे. त्यामुळे हा ग्रामसभेचा निर्णय रद्द करावा असे कळविले आहे. या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आंदोलनकर्त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने आंदोलन मंगळवारी दुसऱ्या दिवशी ही सुरूच होते.
तीन महिन्यांपूर्वी साटेली भेडशी येथील एका इमारतीत दोन तलवारी सापडल्याची घटना निदर्शनास आली होती. यानंतर ही इमारतही जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर यात सहभागी असलेल्या दोषींवर कारवाई करत त्यांचे साटेली भेडशी कार्यक्षेत्रात असलेले उद्योग व्यवसाय बंद करावेत असा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. मात्र असे असतानाही त्यांचे उद्योग व्यवसाय सुरूच असल्याने पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ग्रामसभेत ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरत जोपर्यंत संबंधित व्यावसायिक यांना लेखी नोटीस बजावून कायमस्वरूपी दुकाने बंद करावीत असा ठराव होत नाही तोपर्यंत हलणार नाही असा आक्रमक पवित्रा धारण करीत तब्बल आठ तास ग्रामसभा चालली होती. त्यानंतर अखेर ग्रामस्थांच्या या मागणीला यश मिळाले मिळत संबंधिताना व त्यांच्या आस्थापनेना व राहत्या घरी नोटीस दिली आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
त्यानंतर या दुसऱ्या ग्रामसभेत झालेल्या ठरावाची प्रत गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना दिल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी या ठरावाची प्रत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना पाठवले त्यानुसार तसेच ज्या संबंधितांना नोटीस काढली होती. त्यांनी या ठरावाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे दाद मागल्यानंतर उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला गटविकास अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे कळवले. त्या सदर अहवालामध्ये ग्रामपंचायत साटेली भेडशी यांनी ग्रामसभा दिनांक ०५.०५.२०२५ चे इतिवृत्त मासिक सभा दि. २३.०६.२०२५ चा १२(२) ठराय व खास मासिक सभा दि.०४.०७.२०२५ चे इतिवृत्त ठरावामध्ये भारतीय घटना कलम १९(६) ने घटनेच्या मुलभूत अधिकार असलेले व्यवसाय करण्याच्या हक्काला बाधा पोहचत आहे. तसेच भारतीय घटना कलम २१ चे उल्लंघन करत आहे. त्यामुळे त्याची अंमलबाजावणी स्थागित करण्याची सुचना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १५२ नुसार साटेली भेडशी ग्रामपंचायतीला देण्यात आली आहे, असा अभिप्राय असुन संविधानिक अधिकाराप्रमाणे अनुच्छेद १९(१) (g): भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकास कोणताही कायदेशीर व्यवसाय, व्यापार किंवा उद्योग करण्याचा मूलभूत अधिकार आहे. ग्रामपंचायतीने घेतलेला ठराव हा या अधिकाराचा सरळ उल्लंघन आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला व्यक्तीच्या व्यवसायावर बंदी घालण्याचा अधिकार नाही.
नमुद ठरावांच्या आधारे ग्रामपंचायतीच्या मासिक सभा किंवा ग्रामसभामधील अंमलबजावणी तात्काळ लक्षवेधी प्रभावाने स्थगित करावी व या पुढे मासिक सभा किंवा ग्रामसभा ठरावाने भारतिय संविधानाच्या अधिकारास बाधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशा आशयाचे पत्र गटविकास अधिकारी द्वारा साटेली भेडशी ग्रामपंचायत यांना देण्यात आले ही बाब ग्रामस्थांना कळल्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात एकटवले व ग्रामसभेने घेतलेला ठराव कुठल्याही परिस्थितीत रद्द करू नये संबंधितांची व्यवसाय आस्थापने कायमस्वरूपी बंद करावीत व जो उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो तात्काळ रद्द करावा अन्यथा आम्ही ग्रामपंचायत मध्ये हे आंदोलन सुरूच राहील सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या आंदोलन मंगळवारी दुसऱ्या दिवशी सुरू होते या या आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी जोपर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग हे ग्रामपंचायत मध्ये येऊन ग्रामस्थांशी चर्चा करून ग्रामसभेने घेतलेला निर्णय रद्द करत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मंगळवारी सायंकाळी ही हे आंदोलन सुरूच होते सोमवारी, मंगळवारी गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांनी सलग दोन दिवस ग्रामपंचायत मध्ये येत ग्रामस्थांची चर्चा केली मात्र ही चर्चा निष्फळ ठरली असून ठिय्या आंदोलन सुरूच आहे.