
सावंतवाडी : शहरातील अस्वच्छतेबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेट घेत दहा दिवसांचा अल्टिमेट दिला होता. त्यानंतर तातडीने आज नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात स्वच्छतेला सुरुवात केली आहे. याबाबत श्री साळगावकर यांनी तात्काळ दखल घेतल्याने प्रशासनाबाबत समाधान व्यक्त केले आहे.