कुडाळच्या नगरसेवकांना बजावल्या नोटीसा !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 29, 2023 11:00 AM
views 182  views

कुडाळ : "विकसित भारत संकल्प यात्रा' मोहिमच्या यात्रेस विरोध अथवा समर्थन करण्याच्या कारणावरुन वाद विवाद करुन गैरकृत्य केल्यास व त्यामुळे दखलपात्र किंवा अदखलपात्र अपराधासारखे अनुचीत प्रकार होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. या नोटीसचा उपयोग न्यायालयात पुरावा म्हणून वापर करण्यात येईल.  याची नोंद घ्यावी अशा नोटिसा (फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४९ प्रमाणे ) उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक मंदार शिरसाट, निलेश परब, गणेश भोगटे, संध्या तेरसे, उदय मांजरेकर यांच्यासह कुडाळ नगरपंचायतमधील सत्ताधारी व विरोधक नगरसेवकांना बजाविण्यात आल्या आहेत.

विकसित भारत संकल्प यात्रा आज दुपारी कुडाळ नगरपंचायत पटांगणावर येत आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये  म्हणून खबरदारी घेतली आहे. केंद्र शासनाकडुन "विकसित भारत यात्रा" मोहिम चालु असुन त्यामध्ये ५ शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. ही यात्रा कुडाळ नगरपंचायत पटांगण येथे येणार आहे. त्यात नगरपंचायत कुडाळ येथे झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये संकल्प यात्रेच्या विषयावरुन सत्ताधारी व विरोधक गटामध्ये वादंग निर्माण झालेली बातमी प्रसिध्द झालेली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर या नोटीस बजावण्यात येत आहे असे पोलीस प्रशासनाने बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.