कुडाळात भाजपच्या कार्यकर्त्यांना नोटीसा..!

Edited by: भरत केसरकर
Published on: February 04, 2024 05:36 AM
views 765  views

कुडाळ : उद्धव ठाकरे यांच्या आज सिंधुदुर्ग दौऱ्यात कुडाळ येथील होणारी सभा भाजपने काल रात्री उशिरा उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर भाजपच्या १५ ते २० कार्यकर्त्याना काल रात्री उशिरा कुडाळ पोलिसांनी नोटीस जारी केली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४९ प्रमाणे ही नोटीस काल रात्री देण्यात आली आहे. शिवसेना उ.बा. ठा. पक्षाचे वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन केलेले असून पक्षप्रमुख  उध्दव ठाकरे यांची आज ०४ फेब्रुवारी रोजी कुडाळ मध्ये येणारी RSN हॉटेल ते पोस्ट नाका अशी मोटारसायकल रॅली व जिजामाता चौक येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शिवसेना उ.बा.ठा. पक्षाचे कार्यक्रमाचे मुदतीत व शासनाकडून झेडप्लस सुरक्षा असलेले व्हि.आ.पी शिवसेना उ.बा.ठा. पक्ष प्रमुख  उध्दव ठाकरे यांच्या दौ-याचे मुदतीत आपणाकडून व आपले समर्थकांकडुन सार्वजनिक शांतता भंग होण्यासारखे दखलपात्र अपराध होण्याची तसेच जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी २८.०१.२०२४ रोजी ००.०१ वाजले पासुन ते दि. ११.०२.२०२४ रोजी २४.०० वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ) ते (फ) आणि ३७ (३) प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हयात लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग होण्याची शक्यता असल्याने त्यास प्रतिबंध करणे क्रमप्राप्त होत आहे.त्या अनुषंगाने श्रीम.रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक, कुडाळ पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४९ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये भाजप कार्यकर्त्यांना प्रतिबंध करण्याच्या हेतूने या नोटीस अन्वये -०४.०२.२०२४ रोजीच्या शिवसेना उ.बा.टा पक्षाचे कार्यक्रम व महनीय व्यक्ती यांच्या दौ-याचे मुदतीत आपणाकडून अगर आपल्या सहका-याकडुन कोणत्याही  दखलपात्र/अदलखपात्र अपराधासारखे अनुचीत प्रकार होवू नयेत. तरी सुध्दा नोटीसचा भंग करुन कोणताही अनुचीत प्रकार होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणावर व संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करुन सदर नोटीसचा उपयोग न्यायालयात पुरावा म्हणुन वापर करण्यात येईल.असा इशारा देण्यात आला आहे.नगरसेवक निलेश परब,नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर,चांदणी कांबळी,राकेश कांदे,माजी नगरसेवक सुनिल बांदेकर यासह १५ ते २० भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे.