
देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे हायस्कुल येथील विद्यार्थ्यांना वहया वाटप व शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या निमित्ताने मुणगे ग्रामपंचायत सदस्या रवीना मालाडकर यांच्या वतीने श्री भगवती हायस्कूल मुणगे येथील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वहया वाटप करण्यात आले. व या वेळी शिक्षक सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी सभापती सुनील पारकर यांनी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी विद्यार्थी शिक्षक वर्गाला शुभेच्छा देखील दिल्या. मागील अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत असताना शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप व विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, त्यांच्या कलागुणांना वाव देत, सातत्याने त्यांच्या पावलाबरोबर प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षक वर्गांचा शाल व भेटवस्तू देऊन सन्मान यावेळी करण्यात आला. प्रशालेच्या वतीने प्रभाग सेविका रवीना मालाडकर यांचे आभार मानण्यात आले.शाळेचा माजी विद्यार्थी मयुरेश पुजारे याची एनसीसी प्रशिक्षण कॅम्प मधून राज्यस्तरीवर थलसैनिक कॅम्प साठी निवड झाल्याबद्दल प्रभाग सेविका रवीना मालाडकर यांनी भेटवस्तू देऊन सन्मानित केले.
इयत्ता आठवीचा विध्यार्थी दक्षेश मांजरेकर याने शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बागवे, तर आभार प्रदर्शन गौरी तवटे यांनी केले.यावेळी माजी सभापती सुनील पारकर, माजी मुख्याध्यापक संजय बांबुळकर, सरपंच अंजली सावंत, उपसरपंच दशरथ मुणगेकर,माजी उपसरपंच धर्माजी आडकर, मुख्याध्यापिका कुंज मॅडम, तंटा मुक्ती अध्यक्ष राजू पुजारे व शिक्षक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.