
सावंतवाडी : काँग्रेस तालुक्याच्यावतीने काल घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये आगामी विधानसभे संदर्भात कोणत्याही उमेदवारीबाबत एकमुखी ठराव घेण्यात आलेला नाही असा खुलासा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी यांनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेस कडून अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे एका उमेदवाराबाबत कोणताही असा ठराव झालेला नसून फक्त संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे स्थानिक काँग्रेसमध्ये अद्याप ऑल इस वेल नसल्याच पाहायला मिळत आहे.