
सावंतवाडी : अंडरग्राउंड वीज वाहिन्यांचा परतून गेलेल्या निधीला मी नव्हे तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जबाबदार आहेत. कारण, खोदाई केलेले रस्ते बुजवण्यासाठी आपण जिल्हा नियोजनमधून निधी देतो असे सांगून केसरकर यांनी तो दिला नाही. म्हणूनच हे काम होऊ शकले नाही असा प्रत्यारोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी येथे केला. मंत्री, सरकार यांनी आजपर्यंत जनतेला फसवण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उघड करणार असून गावोगावी त्यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचा इशाराही बबन साळगावकर यांनी दिला. श्री साळगावकर यांनी आज आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेत मंत्री दीपक केसरकर यांनी ग्राउंड विज वाहिन्या केलेल्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले सावंतवाडी शहरातील मंजूर झालेल्या अंडरग्राउंड वीज वाहिन्यांच्या निधीसी केसरकर यांचा काडी मात्र ही संबंध नव्हता कारण सदरचा निधी हा तत्कालीन वीज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपलब्ध करून दिला होता ओरस येथे झालेल्या बैठकीत आपण शहरातील विजय संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी हा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती मात्र निधी उपलब्ध झाल्यानंतर रस्तेखोदाई नंतर ते पुन्हा सुस्थितीत करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद त्यामध्ये नसल्याने हे काम रखडले होते त्यावेळेच्या नगर परिषदेच्या संपूर्ण बॉडीने सभागृहात एकमुखी ठराव घेऊन 2900 स्क्वेअर फुट इतका अंदाजित खर्च ठरवून सदरचे काम वीज वितरण कंपनीला करण्यास सांगितले होते परंतु हा खर्च जिल्हा नियोजन मधून उपलब्ध करून देतो असे मंत्री केसरकर यांनी सांगितले होते. शेवटपर्यंत त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिला नाही.त्यावेळी जर रस्तेखोदाई केली असती तर संपूर्ण शहरामध्ये उद्रेक झाला असता कारण रस्ते पुन्हा सुस्थितीत करण्यासाठी पालिकेकडे निधीश नव्हता मुळात जनतेचा उद्रेक होऊन मला बदनाम करण्यासाठी केसरकर यांचा हा डाव होता तर दुसरीकडे निधी देऊन काम पूर्ण झाले असते मला याचे श्रेय मिळणार असते ते श्रेय केसरकर यांना द्यायचे नव्हते म्हणून त्यांनी निधीही उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे अंडरग्राउंड वीज वाहण्याचा निधी परतून जाण्यास सरकार हेच जबाबदार होते हे जनतेने लक्षात घ्यावे.
ते पुढे म्हणाले सावंतवाडी शहरांमध्ये श्वेता कोरगावकर नगराध्यक्ष असताना छत्तीस कोटी रुपये भुयारी गटार योजनेसाठी आले होते ही योजना ही केसरकर यांच्या हट्टापायी होऊ शकली नाही. मला हे योजना वेगळ्या पद्धतीने राबवायची आहे ते सांगून वेळ मारून घेण्याचा प्रकार केला शेवटी ही योजना झालीच नाही कारण श्वेता कोरगावकर यांना या योजनेचे श्रेय मिळणार होते. केसरकर यांनी आजपर्यंत केवळ राजकारणाचा व्यवसाय केला आहे त्यांनी स्वतःपेक्षा कोणी मोठं झालेलं पाहवत नाही त्यामुळे त्यांनी केवळ पैसा टाकून कार्यकर्त्यांना लाचार बनवून ठेवले आहे.