
सावंतवाडी : तालुक्यातील नाणोस ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्राजक्ता शेट्ये यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायत सदस्याने घेतलेल्या अविश्वास ठरावावर १० मार्च रोजी ग्रामपंचायत नाणोस येथेक गुप्त मतदानाद्वारे प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी त्या ठिकाणी मतमोजणी होऊन अविश्वास ठरावावर कार्यवाही होणार आहे.
नाणोस ग्रामपंचायतीवर सौ. शेट्ये या थेट सरपंच म्हणून निवडून गेल्या होता. ग्रामपंचायत च्या माध्यमातून सरपंच म्हणून काम करत असताना सदस्यांना विश्वासात न घेणे तसेच मनमानी कारभार करणे आधी प्रकाराला कंटाळून ग्रामपंचायतीच्या एकूण सात सदस्यांपैकी सहा सदस्यांनी विशेष ग्रामसभेत 16 जानेवारी रोजी अविश्वास ठराव घेत तो पुढील कारवाईसाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपविला होता. या ठरावाला विशेष ग्रामसभेसमोर गुप्त मतदानाद्वारे किंवा साध्या बहुमताने संमती देणे आवश्यक असल्याने गटविकास अधिकारी यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या आदेशानुसार सहाय्यक गटविकास अधिकारी यांची या कामी नेमणूक केली आहे. अविश्वास ठरावावर 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता विशेष ग्रामसभेने ग्रामपंचायत कार्यालयात गुप्त मतदान प्रक्रिया होणार आहे यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.