
वैभववाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयांच कोकणासाठी मोठ योगदान आहे. त्यांच्या कामाची बरोबरी कोणाशी होऊ शकत नाही. विरोधकांनी राजकारणापर्यंत टिका करणे ठिक आहे. मात्र पातळी सोडून जर कोण बोलणार असेल तर यापुढे त्याला सोडणार नाही. योग्य प्रकारे त्याला उत्तर दिले जाईल, असा इशारा जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी दिला आहे.
जिल्ह्यात सध्या भाजपा व शिवसेना यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेचे आ.भास्कर जाधव यांनी कुडाळ येथे केलेल्या भाषणानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आ.जाधव यांनी केलेल्या टिकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर येत आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टिका करणाऱ्यांना जयेंद्र रावराणे इशारा दिला आहे. यापुढे राणे कुटुंबावरील टिका आम्ही खपवून घेणार नाही. राणे स्टाईलने उत्तर दिले जाईल.ज्यांची लायकी नसणारे राणेंवर टिका करीत आहेत. अशा लोकांनी यापुढे आपल चालणार तोंड आता बंद कराव.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्यासह कोकणासाठी मोठ काम केले आहे. कोकणात दिसणारा आजचा विकास हा त्यांच्या मुळेच आहे. देशात कोकणी माणसाला ताठ मानने फिरता येते ते या नेतृत्वामुळेच आहे. कोकणची ओळख त्यांनी सातासमुद्रापार पोहचवली. अशा व्यक्तीवर टिका करताना विरोधकांनी थोड भान ठेवाव.टिकाकारांनी स्वतः च कतृत्व आधी दाखवून द्यावे. यापुढे राणे कुटुंबावर टिका झाल्यास त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल असा इशारा श्री रावराणे यांनी दिले आहे.