कितीही चौकशा लावल्या तरी शेवटपर्यँत उद्धव ठाकरेंसोबत

शिवगर्जना मेळाव्यात वैभव नाईक यांची गर्जना
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 25, 2023 20:59 PM
views 237  views

मालवण : शिवसेनेन सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरभरून दिल. आता आपण शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना साथ देणे गरजेचे आहे. त्यासाठी आमच्या कितीही चौकशा लावल्या, कितीही त्रास दिला तरी मी शेवट पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना मेळाव्यात स्पष्ट केले. 

      

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज मालवण तालुक्याचा शिवगर्जना मेळावा समर्थ हॉल कोळंब येथे संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बाळ महाभोज, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, युवतीसेना कुडाळ मालवण प्रमुख शिल्पा खोत, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, अरुण लाड, विभागप्रमुख बंडू चव्हाण, समीर लब्दे, राजेश गावकर, कमलाकर गावडे, विजय पालव, प्रवीण लुडबे, पूजा तोंडवळकर, शीला गिरकर, सन्मेष परब, तृप्ती मयेकर, वायरी सरपंच भगवान लुडबे, कोळंब सरपंच सिया धुरी, कांदळगाव सरपंच रणजित परब, तळगाव सरपंच लता खोत, आशिष परब आदी उपस्थित होते. 


यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने कोणी विकास केला असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. सहा महिन्यापूर्वी शिवसेनेचे ९० टक्के आमदार  सोडून गेले. चार दिवसापूर्वी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेले. तरीही शेकडोंच्या संख्येने शिवगर्जना मेळाव्याला लाभलेली उपस्थिती हीच ठाकरे ब्रँडची किंमत आहे. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरभरून दिले आता तुम्ही आम्ही शिवसैनिकांनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना साथ देणे गरजेचे आहे. त्यासाठी किती चौकशा लावल्या, कितीही त्रास दिला तरी मी शेवट पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणार आहे. शिवसेनेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, सांगितला जाईल तेव्हा निष्ठावंतांच्या नावाची नोंद सुवर्णअक्षरांनी केली जाईल. उद्धव ठाकरे यांनी जो विश्वास आमच्यावर दाखविला तो सार्थ ठरवणार आहोत. आज आपले मुख्यमंत्री नसतील, पालकमंत्री नसतील तरी लोकांची ताकद आपल्या सोबत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.