कोणत्याही प्रकारची नियमबाह्य कर्ज प्रकरणे केली नाहीत : प्रकाश मोर्ये

सगुण धुरी, दादा बेळणेकर - दिलीप माळकर यांचे आरोप फेटाळले
Edited by: ब्युरो
Published on: October 26, 2023 20:15 PM
views 146  views

कुडाळ : माणगांव येथील सर्वोदय सहकारी पतसंस्था मर्यादित, माणगांव संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व संचालकांनी कोणत्याही प्रकारची नियमबाह्य कर्ज प्रकरणे केली नाहीत. तसेच स्वतः चुकीच्या पध्दतीने कर्ज उचल केलेली नाही. उलट संस्थेच्या चांगल्या कामामुळेच सलग तीन वर्ष संस्था ‘अ’ वर्गात आली आहे. असे सांगत विरोधी गटाचे संचालक व सभासदांचे आरोप विद्यमान अध्यक्ष प्रकाश मोर्ये यांनी फेटाळुन लावले आहे.सर्वोदय सहकार पतसंस्था, माणगांवचे संचालक दादा बेळणेकर, सगुण धुरी व दिलीप माळकर यांनी विद्यमान अध्यक्ष प्रकाश मोेर्ये, संचालक जोसेफ डांटस, उत्तम सराफदार व प्रफुल्ल सुरेश सुद्रिक यांच्यावर चुकीच्या पध्दतीने कर्ज उचल केल्याचा आरोप केला होता. त्याबाबत प्रकाश मोर्ये यांनी कुडाळ एमआयडीसी येथे गुरूवारी पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडन केले. यावेळी संचालक उत्तम सराफदार, जोसेफ डॉन्टस, कुडाळ संघाचे अध्यक्ष दिपक नारकर, मोहन सावंत,गोविंद धुरी आदि उपस्थित होते.

      यावेळी मोर्ये म्हणाले की, गेली 37 वर्ष या संस्थेची निवडणुक झालेली नाही. एकोप्याने बिनविरोध पध्दतीने संचालकांची निवडणुक होत होती. यावेळी सुध्दा अशाच पध्दतीने बिनविरोध निवडणुक होणार होती. दादा बेळणेकर यांना अध्यक्ष देण्याचे आम्ही कबुल केले होते. तरी देखील विरोध करणार्‍या या संचालक व सभासदांनी ही निवडणुक लादली आहे. मी कधीही पदाचा गैरवापर केला नाही. गेली अनेक वर्ष सहकारामध्ये आहे. कै. शिवरामभाऊ जाधव यांनी मला माणगांव संस्थेवर आणलं. तिथंपासुन मी या संस्थेचा संचालक आहे. गेली चार वर्ष मी अध्यक्ष आहे. अध्यक्ष पदाच्या काळात संस्थेचे कॅश के्रडीट वापरले नाही. संस्थेकडे चांगल्या ठेवी आल्या. माणगांव सारख्या ग्रामीण भागात संस्थेकडे 11 कोटीच्या ठेवी आल्या आहेत. हा संस्थेवर सभासद व नागरीकांनी दाखविलेला विश्वास आहे. काम करत असताना एखादी सही राहिली असेल ती सही करून घेण्याबाबत ऑडीटरने सुचना केल्या असल्याचे श्री. मोर्ये यांनी सांगितले. मी घेतलेल्या प्रत्येक कर्जाला तारण ठेवलेले आहे. मी सातत्याने कर्ज घेतलेले आहे पण मी थकीत नाही. मी जिल्हा बँकेवर सुध्दा संचालक आहे. थकीत असतो तर बँकेवर संचालक राहु शकलो नसतो. जोसेफ डॉन्टस, उत्तम सराफदार, प्रफुल्ल सुद्रिक यांनीही संस्थेची कर्ज घेतली पण त्यांची कर्र्जे थकीत नाहीत. सुद्रिक यांच्या पत्नीच्या नावे कर्ज आहे, ती जिल्हा बँकेची कर्मचारी असल्याने कर्जाच्या सुरक्षितेसाठी कर्ज दिले. खरं तर सगुण धुरी यांना यापुर्वी सभासद करून घेतलं नव्हत. तीन वर्षापुर्वी आम्ही त्यांना या संस्थेत सभासद करून घेतलं. दादा बेळणेकर यांना सुध्दा आम्ही संचालक करून घेतल. सर्वोदय पतसंस्थेचे कामकाज चांगल्या पध्दतीने सुरू आहे. त्यामुळेच सलग तीन वर्ष आपली पतसंस्था ‘अ’ वर्गात आहे. एकच ऑडीटर कायम ठेवू शकत नाही. त्यामुळे कोल्हापुर येथील ऑडीटरची या पतसंस्थेचे ऑडीट करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे श्री. मोर्ये यांनी सांगितले.

      *सगुण धुरींना मी सभासद केले- प्रकाश मोर्ये* 

     जे सहकाराची तत्त्वज्ञान सांगत फिरत आहेत. त्या सगुण धुरींना सहकार महर्षी कै.शिवरामभाऊ जाधव यांनी जवळ सुद्धा घेतलं नव्हतं.कुठच्या संस्थेवर साध सभासद पण करून घेतलं नव्हतं.तीन वर्षा पूर्वी सर्वोदय पतसंस्थेचे सभासद झालेल्या  सगुण धुरींना या संस्थेवर बोलण्याचा पूर्णपणे नैतिक अधिकार नाही आहे.त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये मी दहा लाखाचा कर्ज घेतले आणी इतर संचालकांनी लाखाचे कर्ज घेतलय म्हणून उगाजच ओरड मारत बसू नये.कारण आपण ही दितसर कर्जे घेतली असून न चुकवता हप्ते भरत आहोत. पतसंस्थेमध्ये सातत्याने दोन ते तीन प्रकारचं ऑडिट झालेलं असतं. एक पहिलं ऑडिट झालेला असतो त्यानंतर सातत्याने कोल्हापूरचे ऑडीटर यांनी अॅडीट केलेले आहे.गेली  तीन वर्ष सातत्याने अ वर्ग मिळालेला आहे आणि अ वर्ग मिळाल्यामुळे त्यांनी सुद्धा आपल्या पत्रकामध्ये अ वर्ग मिळालेला हे नमूद केलेलं आहे. कारण जर संस्थेचा स्वच्छ कारभार नसेल चांगला कारभार नसेल तर अ वर्ग कधीही मिळत नाही. ज्यावेळी सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांनी ही संस्था स्थापन केली तिथपासून जवळजवळ 25 वर्ष या संस्थेवर मी संचालक म्हणून आहे. सातत्याने आम्ही कर्ज घेतोय आणी भरतोय सुद्धा आहे. सर्वोदय पतसंस्थेचा गेले चार वर्षे मी अध्यक्ष म्हणून काम करतोय  त्या ठिकाणी 11 कोटी आमच्या संस्थेत ठेवी आहेत. आणि ह्या सर्वसामान्य माणसाच्या ठेवी आहेत.त्यामुळे सगुण धुरी,दिलीप माळकर आणी दादा बेळणेकर यांनी सर्वोदय पतसंस्थेची बदनामी थांबवावी असा टोला लगावत जोरदार टीकेची झोड विद्यमान अध्यक्ष प्रकाश मोर्ये यांनी उटवली आहे.त कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊसवर पत्रकार परिषदेत बोलत होते.

    प्रकाश मोर्ये यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत मी २८ तारीख नंतरच बोलेन असा इशारा विरोधकांना दिला आहे.