नको दादा, नको ताई आता फक्त अर्चनाताई : संदीप गवस

Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2023 12:00 PM
views 144  views

दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दोडामार्ग तालुक्यात पार पडत आहे. यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस यांनी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी केली. 


ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी मतदारसंघात आलेल्या अर्चना घारे-परब घराघरात पोहोचल्या आहेत. संकटं काळात लोकांमध्ये जात आधार म्हणून उभ्या राहत आहेत. त्यामुळे त्यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी करत नको दादा, नको भाई आता फक्त अर्चना ताई अशी घोषणा त्यांनी दिली.


याप्रसंगी खा. सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, व्हिक्टर डॉंन्टस, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, निरीक्षक शेखर माने, नम्रता कुबल, रेवती राणे, प्रसाद रेगे, संदीप गवस, सावली पाटकर,प्रदीप चांदेलकर, महादेव देसाई, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, गौतम महाले, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते