सावंतवाडी मतदारसंघात युती नको, मैत्रीपूर्ण लढू | एकदा काय ते होऊन जाऊ दे !

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचं थेट आव्हान
Edited by: विनायक गांवस
Published on: May 08, 2023 18:00 PM
views 178  views

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात आता भाकरी परतावी, तरच रखडलेले प्रश्न मार्गी लागतील. पराभवावरून हिणवणाऱ्या केसरकरांनी मतदासंघात भाजपची केवळ एक ग्रामपंचायत असताना मी ३० हजार मते घेतली होती. तर दुसऱ्यावेळी अपक्ष म्हणून ५७ हजार मते घेतली होती, ध्यानात ठेवावं. पराभव तर इंदिरा गांधींचाही झाला होता. त्यामुळे दीपक केसरकर यांनी गुर्मीत व घमेंडीत राहू नये, युतीची भाषा करण्यापेक्षा या मतदारसंघात ‘स्पेशल केस ‘ म्हणून मैत्रीपूर्ण लढू, एकदाच काय ते होऊन जाऊ दे अस, आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिलय.


यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगांवकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.